नव अंकुर फुटतो
नव नाद भरल्या रानात
ताल बेभान वाजतो
मेघ पाहून आभाळी
धुंद मयूर नाचतो
असा झिम्मड पाऊस
वारा फुगडी खुलतो
गंध मातीचा सुटला
मन पिसारा फुलतो
जाता स्पर्शून तुषार
अंगी शहारा उठतो
चिंब भिजल्या मातीत
नव अंकुर फुटतो!
प्र..श्री.जाधव
नव नाद भरल्या रानात
ताल बेभान वाजतो
मेघ पाहून आभाळी
धुंद मयूर नाचतो
असा झिम्मड पाऊस
वारा फुगडी खुलतो
गंध मातीचा सुटला
मन पिसारा फुलतो
जाता स्पर्शून तुषार
अंगी शहारा उठतो
चिंब भिजल्या मातीत
नव अंकुर फुटतो!
प्र..श्री.जाधव