गंध मातीचा मातीचा
गंध मातीचा मातीचा
ओल्या रानात दाटला //धृ//
गेली भेगळून माती
वारा झालाय निखारा
तग धरल्या जीवांनी
किती सोडावा सुस्कारा
दया येऊन मेघाचा
कंठ दाटुनी आला //१//
शहारली झाडे वेली
आलं आभाळ भरून
हर्ष दाटून मनात
गाते कोकिळा चोरून
शील घुमली रानात
मोर नाचला नाचला //२//
लखलखाटून वीज
मेघ शांत शांत झाली
अधिर ही सर सर
माल रानांत झरली
खळखळट पाण्याचा
गात वाराही सुटला //३//
-प्र.श्री.जाधव
गंध मातीचा मातीचा
ओल्या रानात दाटला //धृ//
गेली भेगळून माती
वारा झालाय निखारा
तग धरल्या जीवांनी
किती सोडावा सुस्कारा
दया येऊन मेघाचा
कंठ दाटुनी आला //१//
शहारली झाडे वेली
आलं आभाळ भरून
हर्ष दाटून मनात
गाते कोकिळा चोरून
शील घुमली रानात
मोर नाचला नाचला //२//
लखलखाटून वीज
मेघ शांत शांत झाली
अधिर ही सर सर
माल रानांत झरली
खळखळट पाण्याचा
गात वाराही सुटला //३//
-प्र.श्री.जाधव
good one
ReplyDelete