Sunday, 9 September 2012

निसर्ग कविता

गंध मातीचा मातीचा

गंध मातीचा मातीचा
ओल्या रानात दाटला //धृ //

गेली भेगळून माती
वर झालाय निखारा
तग दाराला जीवानी
किती सोडवा सुस्कारा
      दया येवून मेघांचा
      कंठ दाटुनी आला //१//

शहारली झाडे वेली
आलं आभाळ भरून
हर्ष दाटून मनात
गाते कोकिला चोरून
      शीळं  घुमली रानात
      मोर नाचला नाचला //२//

लखलखाटून  वीज
मेघ शांत शांत झाली
अधीर ही सरसर 
रानमाळात झरली 
    खळखळाट  पाण्याचा
    गात वाराही सुटला  // ३//
             - प्र श्री जाधव



No comments:

Post a Comment